
"वन इंडियन गर्ल‘ हे पुस्तक 1 ऑक्टोबरला बाजारपेठेत दाखल होत आहे. याआधीच्या त्यांच्या कादंबऱ्यांच्या तुलनेत ही कादंबरी वेगळी असून,तरुणीच्या दृष्टिकोनातून ती लिहिली आहे. कादंबरीचा टिझर "यू ट्यूब‘ या संकेतस्थळावरही उपलब्ध करून देण्यात आला आहे. दोन आठवड्यांत विवाह होणार असलेली राधिका या तरुणीच्या निवेदनातून ही कादंबरी उलगडली जाणार असल्याचे टिझरमध्ये म्हटले आहे. या टिझरमध्ये राधिका म्हणते, ""मी या आठवड्यात विवाहबद्ध होणार आहे. मी आघाडीची इन्व्हेस्टमेंट बॅंकर आहे. माझी वेडेपणाची गोष्ट वाचल्याबद्दल धन्यवाद! मला तुम्हाला एक इशारा द्यायचा आहे. ही गोष्ट तुम्हाला फार काही पसंत पडणार नाही. पहिला मुद्दा म्हणजे मी खूप पैसे कमावते आणि दुसरा म्हणजे माझे प्रत्येक गोष्टीबद्दल मत आहे. अखेरचा तिसरा मुद्दा म्हणजे याआधी माझे शारीरिक संबंध होते. मी जर मुलगा असते, तर तुम्हाला या गोष्टी चांगल्या वाटल्या असत्या. मी मुलगी असल्याने तुम्हाला त्या आवडत नाहीत ना?‘‘
‘फाईव्ह पॉर्इंट समवन’ व इतर अनेक कादंबरीमुळे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचलेल्या चेतन भगत यांच्या पुढील ‘वन इंडियन गर्ल’ या पुस्तकाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. त्यांनी लिहलेली आजवरची सगळी पुस्तकांना वाचकांमध्ये तुफान प्रतिसाद मिळाला आहे. चेतन भगतच्या यापूर्वी प्रकाशित कादंबऱ्यांवर चित्रपट बनले आहेत. या कांदबरीवर सिनेमा निघतो का हे पाहणे रंजक ठरणार आहे.
- प्रविण रघुनाथ काळे
![]() |
प्रकाशित - दैनिक प्रभात, पुणे २ सप्टेंबर २०१६ |
0 Comments