मासाहेब तुम्ही ग्रेट होता
महाराष्ट्रासाठी अनमोल भेट होता
शिवबा घडवायला
तुम्ही कणखर होता
संभाजी घडवायला
तुम्ही सक्षम होता
मासाहेब तुम्ही ग्रेट होता
घडवला इतिहास तुम्ही
पण आज तो
विसरल्यासारख वागतो आम्ही
तुमच्या संस्काराचा प्याला
असा रिताच राहिला
तुमचा कणखर बाणाही
पाण्यासारखा वाहिला
इतिहासही तुमचा फक्त
मार्कापुरता राहिला
मावळ्यांच बलिदानही
चरणधुळीत मिसळल
वारसाही तुमचा
वादात विसरला
वाटत मासाहेब आज
तुम्ही हव्या होत्या
पुन्हा एकदा शेर शिवबा
छावा संभाजी घडवण्यासाठी
इथल्या आपल्यातल्याच
मोगलांना रडवण्यासाठी...
- प्रविण रघुनाथ काळे
मो : 8308793007
ईमेल : kalepravinr@gmail.com
0 Comments