भींत.. { कविता }



पाडलेल्या भींतीवरून
पक्षी ओरडत होता
घर होत त्यावर त्याच
ओरडून तो सांगत होता

कशावरून तरी काल
दंगल पेटली म्हणे
मंदीर-मस्जिद म्हणत
भींत पाडली म्हणे

दगडविटांची होती भींत
जाती धर्माची नव्हती
म्हणूनच त्या भींतीवर
पक्ष्यांची घरटी होती

पक्षामधे कुठे असतात
धर्म पंथ अन् जाती
आम्ही स्वतःच उभारल्या
जाती धर्माच्या भींती

हिंदू मुस्लीम म्हणत
मंदिर मस्जिदी पाडल्या
त्या पाडलेल्या भींतीखाली
पक्षाच्या भावी पीढ्या गाडल्या....

- प्रविण रघुनाथ काळे 

0 Comments