कधीतरी एकटा {कविता}


कधीतरी एकटा बसल्यावर
मी मनातील भावनांना
वाट करून देतो
कोंडलेल्या माझ्या हुंदक्यांचा
अडथळा दूर करतो

कधीतरी कोपर्यात
सार्यांच्या नकळत
मनसोक्त रडतो
पण चारचौघात
माणसाच्या गर्दीत
माझ्या अश्रूंना
मनातच कोंडतो

कारण चारचौघात रडताना
मनात भीती असते
माझ्या रडण्याने नकळत
डोळ्यातील अश्रू पाहून
कोणाचेतरी डोळे ओलावतील

पण त्याहीपेक्षा
भीती असते
एकदा अनामिक
माझ्या डोळ्यातील
अश्रू पाहून
खुशीने हसेल
माझ्या दुखा:वर ...

-प्रविण रघुनाथ काळे 
प्रकाशित -प्रभात दि. २१ सप्टेबर २०१५


0 Comments