काल रात्री अचानक
स्वप्नात आले बाप्पा
मी म्हणालो थांबा
मारू थोड्या गप्पा
मी म्हणालो बाप्पा
सांगा मला जरा
माणसाचा बदलता स्वभाव
वाटतो का हो बरा
थोडासा विचार करून
बाप्पा थोडं हसले
प्रश्न आहे कठीण
असं पुढे म्हणाले
पण सांगतो जरा
माणसांच्या स्वभावाबद्दल
किती घडवला माणसाने
स्वतः मधेच बदल
माणूस विसरला गेला
संस्कृतीच्या पाऊलखुणा
र्हास केला निसर्गाचा
पूसल्या निसर्ग खुणा
विसरून गेला सारी
संत महात्मांची तत्व
गुंतत गेला स्वतःत
वाढवलं स्वतःच महत्त्व
स्वार्थाच्या मागेपुढे धावत
माणूस पळत राहिला
काहिच हाती नसतानाही
उगाच धावत राहिला
डोळ्यात राग साठवून
बाप्पा पुढे म्हणाले
निसर्ग चक्राच्या बदलाला
तुम्हीच कारण ठरले
निराशा आपली लपवत
बाप्पा निघून गेले
मनाला मात्र माझ्या
खूपच वाईट वाटले..
-प्रविण रघुनाथ काळे
0 Comments