गांधीजी.. { कविता }


आठवता गांधीजी तुम्ही
रस्त्यावरचे दंगे पाहिल्यावर
कळलीच नाही अहिंसा
प्रत्येकजण पटला वै-यावर

तुम्ही दिलेली शिकवण
फक्त पुस्तकातच दिसते
समजतच नाही मनाला
आम्हा हिंसाच का आवडते

मुठभर मीठ उचलून
तुम्ही सारा देश जागवला
तुमच्या कार्याचा वापर मात्र
प्रचारासाठी केला गेला

रस्त्यावरची भांडणे पाहून
तुमची आठवण झाली
तुम्हाला परत येण्याची
विनंती करावी वाटली

क्षणभर वाटली असेल
परत नको म्हटलं
तुम्ही याल परत, पण
पुर्वीसारखेच आजही
तुमचे शत्रू बनतील
तुमच्या अहिंसेशी पून्हा
ते हिंसेने लढतील..

- प्रविण रघुनाथ काळे


0 Comments