साहेब.. (कविता)


"कणा" हि कुसुमाग्रजांची सुप्रसिद्ध कविता सा-यांनीच वाचली असेल. कुसुमाग्रजांची हि कविता त्यांची माफी मागून त्यावर एक विडंबन लिहण्याचा एक प्रयत्न केला आहे.
                   साहेब...
ओळखलत का साहेब मला?’ गर्दीत आला कोणी,
कपडे होते खादीचे, गळ्यामध्ये सुवर्णमणी.

विचकट हसला, नंतर बोलला, मोबाइलमध्ये पाहून,
‘सगळं मिळालंय आज, तुमच्यासोबत राहून’.

याला त्याला लुटून बघा, घरे दारे भरली,
अफरातफरीतुनच बघा आता, किती संपत्ती साचली.

संपत्ती आली, हवा झाली, खूप काही मिळाले,
या साऱ्यावरती आता, पदाचे पांघरून तेवढे राहिले.

पाचपंचीस पोर घेउन रोज दौरे करतो आहे
लोकांमध्ये मिसळण्यासाठी, रोज मेळावे घेतो आहे.

पाठीवर हात जाताच, पायाकडे झुकला
तिकीट द्या फक्त मला, लाचार होवून हसला.

निवडून येईनच नक्की, फक्त तिकीट मिळवून द्याना,
प्रचारसभेत आश्वासनात, मला मंत्री करतो म्हणा!

- प्रविण रघुनाथ काळे


2 Comments