अस्तित्व.. (कविता)


तीही शोधत असते
मीही शोधत असतो
शोधणं एवढ एकच काम
दोघेही करत आहोत
पण दोघांचे शोधणे निराळे आहे

ती शोधत असते
माझ्या आतमध्ये असणारे
तिचे अस्तित्व
आणि मी शोधत असतो
तीच्यातलं सौंदर्य

तीच्या माझ्या या शोधण्यात
मी इतका कसा स्वार्थी मतलबी
असा विचार कधीतरी मनात येतो
मग सुरू होतो मनात
स्वतःच्या अस्तित्वाचा शोध
मनाच्या या कोपर्‍यातून
त्या कोपर्‍यापर्यत
ढवळून निघते मन...
घुमत राहतात भावना मनात
थैमान माजते मनात
फक्त अस्तित्व... अस्तित्व... अस्तित्व...
     -प्रविण रघुनाथ काळे

प्रकाशित दैनिक प्रभात पुणे 
 १९ सप्टेबर २०१६

0 Comments