मोर्चा... (कविता)


मोर्चा...

काहीनी स्वतःच्या सन्मानासाठी
तर काहींनी स्वतःच्या अस्तित्वासाठी
गर्दी जमा केली... 
तेही तुम्ही, तुमची जात तुमचा धर्म
याहूनही तुमची पुढची पीढी धोक्यात आहे
या गोंडस नावाखाली...

तुम्ही आम्ही बाहेर पडलो
हातात झेंडे - बॅनर घेऊन
त्यांची सामाजिक विषयावरील राजकीय भाषंणही
ऐकली, तीही उन्हात उभं राहून

असं आजवर किती वेळा झालंय
त्यांच्या मागण्या, अस्तित्वासाठी
तुमचा माझा वापर केला गेलाय

त्यांच्या मागण्या, अस्तित्व
सगळं पुर्ण झालंय
पण तुमच्या-माझ्या हातात झेंडा तसाच आहे
कधी सन्मानाचा... कधी निषेधाचा...

- प्रविण रघुनाथ काळे
मो. ८३०८७९३००७
पूर्वप्रसिद्धी – मासिक साहित्य  चपराक – जून २०१८








0 Comments