कागद आणि मन {कविता}



पेन चालत राहतो
कधीतरी असाच
कागद संपून जातो
अर्ध्यापेक्षाही बराच

त्यानंतर मात्र पून्हा
लिहणे वाटते गुन्हा
कागद चुरगाळतो
कचरा बनतो
अगदी निरूपरोगी
को-या मनासारखा

कागद आणि मनाची
तुलना होते मनातं
कोराच कागद मनासारखा
कोरच मन कागदासारखं

फक्त, मन
नव्याने भरून येत
पेन लिहित जातो
पण, कागद
अर्धा अधिक भरतो
आणि पून्हा चुरगाळतो...
     
- प्रविण रघुनाथ काळे

0 Comments