गुलाम अलीच्या निमित्ताने...


गुलाम अलींसारख्या कलाकाराला भारतात येण्यासाठी विरोध करणं हे आमच्या भारतीय वैचारिक,सांस्कृतिक परंपरेचे अधःपतन आहे असं आज म्हणता येईल. पाकिस्तान सैनिक भारताच्या सीमेवर हल्ला करतात त्याचा निषेध म्हणून गुलाम अली किंवा इतर कोणत्याही कलाकारांना विरोध करणे म्हणजे यात किती तथ्य आहे. याचा विचार करावा लागेल.

भारतीय संस्कृती मध्ये नेहमीच कलेला महत्त्व देण्यात आले आहे. पण आज या कृतीतून कुठेतरी या परंपरेला तडा जातोय. अस म्हणावे लागेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यातून सिद्ध काय होणार. आमचं देशप्रेम..? कधीच नाही. हे शक्यच नाही. कारण एखाद्या पाकिस्तानी व्यक्तीला तुम्ही भारतात येण्यापासून रोखले. म्हणजे तूम्ही खूप मोठे देशप्रेमी झाले. अस कधीच होणार नाही. याचा विचार विरोध करणाऱ्या लोकांनी करायला हवा. यातून फायदा होईल तो फक्त राजकीय... पण यातून समाजमनावर काही बाबी कायमच्या कोरल्या जातील, हे नक्की...

यातही असा प्रश्न उपस्थित केला तर, विरोध करताय ना.. मग सगळ्यांनाच करा. नाहीतर हे अतीप अस्लम, अदनान सानी यांना कशासाठी ठेवले आहे. फवाद खान सिनेमा काढून गेला. मग अशी दुटप्पी भूमिका कशासाठी ?

दुसरीकडे विरोध करणाऱ्यांना हेही सांगता येईल, त्यांचे विरोध करण्याचे कारण आहे. देशाच्या सीमा व सैनिकांच्या जीवांची... तर त्यांना सांगता येईल. तुम्हाला एवढीच देशाची, देशाच्या सीमेची चिंता असेल, तर तुमचे सैनिक स्वभूमीत स्वकीयांचीच फोडाफोडी,मोडतोडी करायला पाठवण्यापेक्षा सीमेवर पाठवा की... किंवा थेट पाकिस्तानातच घुसवा.. तुमचं फालतू राजकारण कुठे चालवताय? तरूणांना देशप्रेम शिकवायचे असेल तर विरोध करून नाही. तर आपले मत ठामपणे मांडून. व्यक्त करायला शिकवा.

ताजा कलम : कदाचित गुलाम अली येवून कार्यक्रम सादर करून निघून गेले असते. तरी त्यांना इतकी प्रसिद्धी मिळाली नसती. त्यापेक्षा जास्त प्रसिद्धी त्यांना झालेल्या विरोधामुळे त्यांना मिळाली. आणि भविष्यात कधी गुलाम अली पून्हा आपली कला सादर करायला आले तर त्यांना यापेक्षा मोठा प्रतिसाद मिळेल, यात शंका नाही..

        ~~प्रविण रघुनाथ काळे. 

0 Comments