लोकशाही


मतदानाच्या आदल्या रात्री
रात्रभर जागून वाटलेल्या
शे-पाचशेच्या नोटांनी
सारं चित्रच पालटवलं

वस्तू खरेदी करून घ्यावी,
तशी मत खरेदी करून
त्यांनी स्वतःला
सरपंचपदी बसवलं

लोकशाहीचा जयजयकार करत
पैशाच्या ओझ्याखाली
लोकशाही तुडवली
वाईट याचचं आहे
आज लोकशाही बुडवली...!!


खरोखरच पाहतोय ना... ग्रामपंचायत निवडणूक किती नुसता पैशाचा खेळ बनला आहे. काल एकजण सांगत होते. जस काम केल्याचा रोजगार मागावा इतक्या सहजतेने आणि तितक्याच हक्काने पैसे मागतायेत लोक. म्हणजे मतदान म्हणजे नुसता पैशाच्या जोरावर केलेला जोरच आहे.

अस वातावरण असताना याला लोकशाही कशी म्हणायची? असा प्रश्न आहे. देश प्रगती करतोय किंवा करेल, पण जोपर्यंत या देशाचा पाया असणारी खेडी, या खेड्यातल्या निवडणूका अशा पैशाच्या जोरावर होतील तोपर्यंत या देशाचा विकास होईल, अस मला वाटत नाही...

- प्रविण रघुनाथ काळे

0 Comments