बाबासाहेब,
घाव घातले तुम्ही इथल्या
समाजव्यवस्थेच्या मुळावर,
मात केली तुम्ही इथल्या
घनघोर अंधारावर,
म्हणुनच राज्य केल तुम्ही
असंख्य पीढीतांच्या मनावर...
बाबासाहेब,
तोडून टाकल्या शृंखला
इथल्या अमानुष कृत्यांच्या,
खडे ठाकलात तुम्ही
विरोधात अन्यायाच्या,
म्हणूनच कोरलं तुमच नाव
कोपर्यात आमच्या ह्रदयाच्या...
बाबासाहेब
घटनेच्या मांडणीतून तुम्ही
अनेकांना न्याय मिळवून दिला,
अज्ञानाचा अंधार सारून
ज्ञानाचा दिवा पेटवला,
म्हणूनच प्रत्येक शोषिताने
तुम्हाला परमेश्वर मानला...
बाबासाहेब,
आजही आम्हाला अभिमान आहे
तुमच्या बहुविध कार्याचा,
वारसा पुढेच नेऊ आम्ही
तुमच्या लोकपयोगी कामांचा...
- प्रविण रघुनाथ काळे
0 Comments