प्रकाशित - सकाळ पुणे ८ जानेवारी २०१६ |
खरतर त्या क्षणी त्या आजोबांच्या मनाची काय अवस्था असेल त्यांच्या मनाची हतबलता. . त्याच्या दुर्दैवी नशिबाचे फेरे पण कल एक असाच प्रसंग घडला आणि मन सुन्न झाल.
दुपारची वेळ, मेसला निघालो होतो तेवढ्यात एक आजीनी आवाज दिला,म्हटल काय म्हणतात. ते तर पाहुयात आणि गेलो त्यांच्याकडे त्यानी विचारले मोबाईल आहे का ? मनात विचार आला पुण्यात मोबाईल वापरत नसलेला मुलगा शोधून सापडणार नाही पण कदाचित त्यांना काहीच सांगत असतील मोबाईल वापरत नाही.म्हणून मी हो म्हणताच,त्यानी एक कागद दिला त्यावरचा नंबर मी डायल केला पण तो नंबर अस्तित्वात नाही,मी त्यांना म्हटल नंबर चुकीचा आहे त्यावर त्या म्हणाल्या नाही बरोबर आहे मी कागद परत केला आणि नंबर पुन्हा ट्राय केला पुन्हा तेच तेवढ्यात समोरचा दुकानदार म्हणाला अरे जा,त्यांच हे रोजचच आहे मी पण चला म्हटल,तसही त्यापलीकडे मी काहीच करणार नव्हतो आणि नंबर चुकीचा हे त्या मानतही नव्हत्या.
नकळत व्हाटसअप आलेला मेसेज आठवला मनात विचार आला की त्यांनी दिलेला तो नंबर नक्की कोणाचा असेल विचार करता करता ठरवल की त्याना विचारायच आणि परत आलो तिथे गेलो त्या आजी तिथेच होत्या. समोर एक मुलगा होता तोच कागद हातात घेवून, तो नंबर ट्रॉय करत होता. त्या आजी त्याच आशेने पाहत होत्या तो मुलगा एकदा नंबर प्रयत्न करुन गेला. त्या आजी तिथेच होत्या माझ्या मनाची हिम्मत झाली नाही. मी तिथपर्यंत जावुच शकलो नाही जणू पराभवाच झाला, माझ्या मनाचा...
- प्रविण रघुनाथ काळे
- प्रविण रघुनाथ काळे
0 Comments