JNU


दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अतिरेकी अफजल गुरू याला शहिद ठरवून तिथे जे देशद्रोहाला खतपाणी घातले जात आहे. ते पुर्णपणे चूकीचे आहे. त्यावर लिहलेली कविता...
अतिरेक्यांना शहिद ठरवून
जयजयकार त्यांचा होतोय
क्षमा कर भारतमाते, 
आज विद्रोह तुझा होतोय
सियाचीनच्या बर्फामध्ये अनेक
हनुमंतप्पा लढत आहेत
पण दिल्लीतल्या गल्लीमध्ये
देशद्रोही कसे बडबडत आहेत
मिळालेल्या स्वातंत्र्याचा त्यांना
चढलाय किती माज
देशद्रोहाच्या घोषणा देताना
यांना वाटतेय का लाज
देशद्रोही देतील घोषणा
आता ते चालणार नाही
पेटून उठलाय युवक आता,
देशद्रोह सहन केला जाणार नाही....

- प्रविण रघुनाथ काळे

0 Comments