कॉपी पेस्टच्या रात्री...


महाविद्यालयात जानेवारी आणि फेब्रुवारी महिना म्हटले कि जल्लोषाच आणि आनंदाच वातावरण असते. वेगवेगळे डे साजरे करताना विद्यार्थी सार काही विसरून जातो. कुठे कला सादरीकरनाची संधी, तर कधी प्रकल्पाची स्पर्धा. त्यात नंबर यावा आपला ठसा उमठला जावा. त्याने सगळ्यावर छाप पडावी, अस मनातल गुपित साधण्याचे हे दिवस सुरु होतात आणि संपतातही लवकर.

कॉलेज डे चे दिवस संपले कि सगळ्या student नां समोरचा एक अवघड डोंगर दिसतो तो म्हणजे "मिशन सबमिशन" फेब्रुवारी महिन्यात डे संपले कि मार्च महिन्यात सगळ्यांना समोर सबमिशन चे वेध लागतात. मग वर्षभर टेन्शन फ्री राहून कॉलेज लाईफ एन्जॉय करणार्याची मात्र पुरती धावपळ उडते. आणि मग वर्षभर पार्किंग, कॅण्टीन मध्ये केलेला टाईम पास केलेले सगळेच जन फाईल, जरनल, असाईनमेंट च्या शोधत दिसतात. 

मग वर्गात हजेरी लावण्याच प्रमाणही वाढत. शिक्षकांना सतत भेटण्याचा पर्यंत्न चालू राहतो. xerox शॉप मधली गर्दी वाढते. आणि  वर्षभर रेग्युलर कॉलेज करणार्याचा शोध सुरु होतो. आणि रात्र रात्रभर कॉपी पेस्ट सुरु होत. वर्षभरचा आराम करून सगळेच पस्तावलेले दिसतात. तरीही मित्राकडून मागून प्रोजेक्ट, असाईनमेंट ची अखंड खरडपट्टी चालू दिसते, मिशन सबमिशन साठी…
    - प्रविण रघुनाथ काळे

 
प्रकाशित-  दैनिक सकाळ, पुणे
१३ मार्च २०१६

0 Comments