खिडकी.. (कविता)



उन्हाची छोटीशी तीरीप
माझ्या खिडकीच्या काचेवर आदळून
तुझ्या खिडकीच्या काचेवर पडावी
आणि त्याच खिडकीतून
तुझी नजर
माझ्या नजरेला भिडावी

हे सहजच घडलं
अस वाटत असेल तुला
पण तुला माहित नाही
यासाठी खूप वाट
पाहावी लागलीय मला

कारण तु खिडकीत आता आलीस
उन पडल्यानंतर
मी सकाळपासून इथेच उभा आहे
कशासाठी लक्षात आलंच असेल
तुझ्या खिडकीतून
माझ्या खिडकीकडे
तुझ्या नजरेचा एखादा
तिरकस कटाक्ष
माझ्या खिडकीकडे पडावा म्हणून...

- प्रविण रघुनाथ काळे 

0 Comments