पाऊस तुझ्याही घरी कोसळत असेल
अहोरात्र... इथल्यासारखाच...तुलाही सलत असेल
पाऊस माझ्यासारखाच...
काचेच्या खिडकीतून अदृश्य
पावसाकडे पाहताना
तुझ्यासोबत पावसातले दिवस आठवतात
तरीही मन सांगते, वेड्या जून्या
आठवणी का आठवायच्या असतात
पावसाची टपटप तशीच एकसंथ
कानात गुंजन करत राहते
आणि डोळ्यातही दाटून येतो पाऊस
नेहमीसारखीच पून्हा...
फक्त पावसाची एकसारखी टपटप
आणि सगळा पाऊस सुना...सुना..सुना...
- प्रविण रघुनाथ काळे
0 Comments