माणुसकीची भिंत...


कल्पना अगदी साधी : जे नको असेल ते द्याजे हवे ते न्या!! जो देणारा’ असेल,त्याने जास्तीच्यावापरात नसलेल्या वस्तू या भिंतीशी आणून ठेवायच्या.. जो घेणाराअसेलत्याने इथून जे हवे ते उचलून न्यायचे!! सध्या नागपूर, चंद्रपूर, कोल्हापूर, जालना, अकोला, सोलापुर पाठोपाठ पुण्यातही माणुसकीची भिंत उभी राहिली आहे.  
भिंत हा घराचा अविभाज्य भाग असतो. पण हि  भिंत फक्त दगड विटांची असते असे नाही. त्या भिंत तयार करायला अनेकांचे हात लागलेले असतात. त्या भिंतीमागे अनेकांची आयुष्य उभी राहत असतात. आधुनिककरणाच्या जगात अस म्हटल जात कि माणुसकी मागे पडत चालली आहे. पण या साऱ्या आक्षेपांना या माणुसकीच्या भिंतीने खणखणीत चपराक लगावली असच म्हणावे लागेल.
नागपुरात एका ब्रिजखाली एक भिंत रंगवली. या भिंतीवर त्यांनी माणुसकीची भिंतअसे नाव कोरले. नको असेल ते द्या.. हवे असेल ते घेऊन जा..’ असा संदेश रंगवून लहान मुलेमहिलापुरुष असे वेगवेगळे कप्पे करून कपडे अडकवण्यासाठी खिळेही ठोकले. नागरिकांनी त्यांच्याकडील कपडे आणायचे आणि त्या त्या कप्प्यानुसार अडकवण्याची व्यवस्था त्यांनी केली. विशेषत: जुने वापरातील कपडेब्लँकेटस्वेटर्सउबदार कपडे,लहान मुलांचे कपडे स्वच्छ धुवूनइस्त्री करून आणण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. या माणुसकीच्या भिंतीला रखवालदार नाहीतर प्रत्येक अध्र्या-एक तासाने जमेल तसे एक सदस्य येऊन या भिंतीवर एक नजर टाकून जातो. येथे जमा झालेल्या वस्तू ज्यांना ज्या गरजेच्या आहेत त्यांनी त्या घेऊन जाव्यातअसा हा उपक्रम आहे. दुसरीकडे जालना येथे  माणुसकीची भिंत समाजऋण रथ तयार करून शहरातील विविध भागात फिरवण्यात आला. नको असेल ते द्या. हवे असेल ते घेऊन जा. असं आवाहन करण्यात आले त्याला हजारो लोकांचा प्रतिसाद मिळाला.
कोल्हापूरकरांनी तर "माणुसकीची भिंत" या सामाजिक उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. ऐन दिवाळीतील या उपक्रमात 27 ते 30 ऑक्टोबर या चार दिवसात उपलब्ध नोंदीनुसार 2569 लोकांनी कपडे दिले. सरासरी संख्या पकडता एकूण 1 लाख 79 हजार 830 एवढे कपडे जमा झाले. असं सांगण्यात येते आहे. यावरून सहज सांगता येईल किती भरभरून प्रतिसाद याला मिळतो आहे.
मूळ संकल्पना :- मुळात ही संकल्पना इराणची. हा उपक्रम सध्या वॉल आॅफ काइंडनेस’ या नावाने जगभर प्रचंड लोकप्रिय झाला आहे. इराणमधली कडाक्याची थंडी तर दुसरीकडे बेघर लोकांची संख्या मोठी... या साऱ्या प्रश्नावर एका व्यक्तीला उत्तर सापडलं होत ते म्हणजे वॉल आॅफ काइंडनेस अर्थात माणुसकीची भिंत. तेहरान मध्ये सुरु झालेला हा उपक्रम पुढे इराणच्या गावागावात पसरला आणि  अश्या माणुसकीच्या भिंती उभ्या राहिल्या. आणि हाच हा उपक्रम सध्या वॉल आॅफ काइंडनेस’ या नावाने जगभर प्रचंड लोकप्रिय झाला आहे.  त्याच आधाराने आपल्याकडे महाराष्ट्रातही अनेक भिंती उभ्या राहत आहेत. हि आनंदाची बाब आहे.
महाराष्ट्रात सुरुवात :- राजेश दुरुगकर हे भारत पेट्रोलियममधून अधिकारी पदावरून निवृत्त झालेले व्यक्ती, मुळचे नागपूरकर. राजेश दुरुगकर हे अमेरिकेत गेले होते. तेथे त्यांना एका भिंतीवर कपडे अडकविलेले आढळले. उत्सुकतेपोटी त्यांनी हे कपडे कशासाठी लटकविले आहेत याची विचारणा केली. त्यावर त्यांना हे कपडे गोरगरीब लोकांसाठी ठेवण्यात आल्याची माहिती त्यांना मिळाली. आपल्या देशातील एकूण स्थिती पाहता हा उपक्रम राबविण्याचा विचार त्यांच्या मनात आला आणि लगेचच त्यांनी आपल्या मनातील विचार कृतीत उतरवून माणुसकीची भिंती उभी केली. नागपुरमधील  शंकरनगर चौकातील भिंतीवर त्यांनी ४० खिळे ठोकले आहेत. पहिल्याच दिवशी या उपक्रमाला नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत जवळपास ५०० कपडे या माणुसकीच्या भिंतीवर आणून लावले. आणि याच संकल्पनेतून आता संपुर्ण देशभर माणुसकीच्या भिंती उभ्या राहत आहेत.
-- प्रविण रघुनाथ काळे.
प्रकाशित - दैनिक प्रभात, पुणे
 २२ नोव्हेंबर २०१६

0 Comments