भिंतीवरच्या कॅलेंडरची
बाराही पान संपून गेली
ही जाणीव आहे
वर्ष संपल्याची
बारा महिने, ३६५
दिवस, ८७६० तास,
आणि कितीतरी
मिनिटे, सेकंद...
सगळ माग पडलं आहे
आता
आता त्याच
भिंतीवर नव कॅलेंडर सजेल
त्याच ठिकाणी,
त्याच खिळ्यावर...
जून कॅलेंडर असेल
त्याच्याच मागे
वेळ निघून गेली ना
त्याची
अगदी कालपर्यंत
त्याची गरज होती
आज त्याची रद्दी
झाली
असचं काहीतरी असत
ना जगण्याचही
मी, माझ्या आठवणी
सार काही जून झाल
असेल ना
तो, तुझं भविष्य
भासत असेल तुला
भिंतीवर
टांगलेल्या नव्या कॅलेंडरसोबत
खूप सारे प्लानही
ठरले असतात
तरीही कधी उलटून
पहावी लागतात
जुन्या कॅलेंडरची
पाने
जुन्या आठवणी, टिपणे,
नोंदी चाळण्यासाठी
म्हणून तरी जपून
ठेव भिंतीवरचे जून कॅलेंडर
नव्या वर्षाच्या
शुभेच्छा...
- प्रविण रघुनाथ काळे
0 Comments