My New Year Resolotion…



नवीन वर्ष सुरु व्हायला आता फक्त बोटावर मोजण्याइतके दिवस बाकी आहेत. म्हणजे अवघे काही तास. मग विचार आला नव्या वर्षाच्या मुहूर्तावर काहीतरी संकल्प करायला हवा. सकाळपासून विचार करत होतो. काय संकल्प करावा. मागच्या वर्षी ठरवलं होत रोज डायरी लिहायची म्हणून आज डायरीची पान चाळत होतो म्हटले पाहावे तरी आपला संकल्प किती प्रत्यक्षात आला ते. मग कळले कि डायरी लिहणे बंद करून आता चार महिने होत आले आहेत. सप्टेबर पासून डायरी लिहलीच नाही. मग म्हटलं यावर्षी असा काहीतरी संकल्प करावा सोपा आणि महत्वाचे म्हणजे जो संकल्प पूर्णत्वास जाईल असा.
शेवटी स्वतलाच एक प्रश्न विचारलामागच्या एका वर्षात मी काय काय केल ?” आणिअजून काय काय करायला पाहिजे होत ?”  मग मनात उत्तर सुचायला लागली. मी किती काय काय ठरवल होत या २०१६ वर्षात... किती पुस्तके वाचायची होती, किती सार लिहायचं ठरवलं होत, कॉलेजचा स्टडी वेळेवर करायचा, कोणततरी एक वाद्य वाजवायला शिकायचं, आणखी अजून किती तरी...
याहीपलीकडे अजून म्हणजे २०१६ च्या सुरुवातीला ठरवले होते वर्षभरात सोशल मिडीयाचा वापर कमी करायचा. अजून कित्ती काय ठरवले होते!! एवढा सगळा विचार केल्यावर मग स्वतचा स्वताला राग आला म्हटल आपण ठरवलेली एकही गोष्ट पूर्ण करू शकलो नाही. खर सांगू स्वतःबद्दल असा विचार केला कि किती वाईट वाटत ना स्वतःबद्दल. मग सगळा विचार विनिमय केल्यावर मग यावर्षीचा संकल्प केला. तो म्हणजे...

२०१७ चा संकल्प म्हणजे यावर्षी एकही संकल्प करायचा नाही. तसंही ठरवता किती गोष्टी करता येता ना. मग म्हटले या नवीन वर्षात संकल्प करण्याचाच संकल्प करायचा. काहीतरी हटके विचार केला. म्हणून हा असा वेगळ्या प्रकारचा संकल्प... तो फ्रेंडस लोग Happy New Year… 2017

- प्रविण रघुनाथ काळे


0 Comments