सोशल संन्यास



सोशल संन्यास म्हणजे नक्की काय ? .खरतर तो एक पर्याय आहे. नाहीतर ती एक मुक्तीच म्हणावी लागेल. स्वकीयापासून विसरण्याचे आणि कोणाशीही न बोलण्याचा पर्याय आहे.  ती मुक्ती म्हणजे सोशल मीडियापासून घेतलेला संन्यास होय.

खरतर आजकाल आपला स्मार्टफोन म्हणजे आपला एक अवयव बनून गेला आहे. आणि मोबाईल मध्ये फेसबुक, व्हाॅट्सअप म्हणजे तर आपला जीव कि प्राण बनून गेला आहे. त्याची इतकी सवय लागली आहे कि दिवसातले कित्येक तास त्या मोबाईलच्या स्क्रीन मध्ये निघून जातात. अश्या परिस्थितीत या सगळ्या पासून घेतलेली सुटका म्हणजे सोशल सुसाईड होय. आजकाल या पर्यायांचा वापर अनेक जण करताना दिसत आहेत. खूप वेळ वाया जातो, म्हणून अनेक जण सोशल मीडियातून बाहेर पडत आहेत. त्यात काही कण तात्पुरत्या वेळेसाठी तर काहीजण कायमचेच बाहेर पडताना दिसत आहेत. 

कॉलेज मधील मुले सुद्धा परीक्षा, सबमिशन जवळ आले कि तात्पुरत्या काळासाठी मोबाईल अँप अनइन्स्टाॅल करताना दिसतात. उगाच परीक्षा काळात डिस्टर्ब् नको म्हणून. खरतर सोशल मीडियाचा योग्य आणि कामापुरता वापर केला तर त्याचा वापर योग्यच आहे. पण सोशल मीडियाचा अतिरेक झाला कि मग कधीतरी अशी सोशल सुसाईड करण्याची वेळ येते. त्यामुळे सोशल मीडियाचा योग्य वापर केलेलाच बरा... 
                   - प्रविण रघुनाथ काळे 

आमच्या मते - 
ऋतुजा कुलकर्णी - मॉडर्न महाविद्यालय शिवाजीनगर 
सोशल सुसाइड चे मुख्य कारण म्हणजे सोशल नेटवर्किंग साईडचे दुरूपयोग.. लोक सोशल नेटवर्किंग साईड पासून दूर जातात कारण ते फक्त त्याचे दुष्परिणाम पहातात पण सोशल नेटवर्किंग साईडचे जे उपयोग आहेत त्याकडे फारस कोणी लक्ष देत नाही.. कुठल्या ही गोष्टी चा उपयोग आपल्या वापर करण्यावर असतो हे जोपर्यंत लोकांना कळणार नाही तोपर्यंत सोशल सुसाइड थांबणार नाही.
लक्ष्मी साळुंखे - बी जे मेडिकल कॉलेज
माझी exam सुरू झाली कि मला वाटते सोशल नेटवर्किंग साईटमुळे माझा खुप टाइमपास होतो आहे. त्यावेळी मी सोशल मीडियापासून दूर जाते. पण आता त्याची अशी सवय झाली आहे की exam संपली कि लगेच पून्हा सोशल मिडिया अॅक्टीवेट करते.
अक्षय जाधव - शासकीय तंत्रनिकेतन पुणे
सोशल मिडियाचे जसे अनेक फायदे आहेत तसेच अनेक तोटे देखील आहेत. त्यामुळे त्याचा अतिरेक करणे हे चूकीचे आहे.  त्याचा योग्य काळजीपुर्वक वापर केला तर तो वापर फायदेशीरच आहे. म्हणून त्याचा किती आणि कसा वापर करायचा त्याचा विचार केला पाहिजे.

प्रकाशित -  दैनिक प्रभात, पुणे
 २२ जानेवारी २०१७. 

0 Comments