कथा
सकाळचे सात वाजले असतील.
मी अजूनही झोपेत असताना मोबाईल वाजला. तसही मला अगदी सकाळी मला कोणी फोन करत नाही.
कारण आता सगळ्यांना माहित झाल आहे. मी सकाळी किमान ९ पर्यंत तरी झोपेतच असतो.
तरीही फोनच्या दोन तीन रिंग वाजून गेल्यामुळे झोप मोड झाली होती म्हणून फोन उचलला.
हॅलो..., मी झोपेतच
बोललो
हॅलो, मी शिवा
बोलतोय .
हॅलो, मी शिवा
बोलतोय . समोरून तो पुन्हा बोलला.
मी क्षणभर विचारात पडलो,
हा नक्की कोणता शिवा असावा. तेवढ्यात तो समोरून पुन्हा बोलला.
मी
शिवा.. सरपंचाचा मित्र. त्याच्या या बोलण्यानंतर मात्र मनात क्लिक झाल. आणि शिवा
आठवला.
बोल
मी झोपेतच बोललो
सरपंचाने
आत्महत्या केली
काय
?
थोड्याश्या गंभीरतेने मी बोललो. रात्री विहरीत उडी मारून त्याने जीव
दिला स्वताचा. त्या घरामागच्या विहरीत.
त्यानंतर मात्र त्याचं
बोलण मला क्षणभर झेपलच नाही. डोळ्यावरची झोप तर आता उडून गेली होती. शिवाशी काय
बोलाव तेही दोन मिनिट सुचल नाही. थोड्या वेळाने फोन करतो म्हणून मी फोन ठेवून
दिला.
फोन ठेवून दिला पण मनात
मात्र विचारांनी थैमान घातलं . काय कारण शिवाने मला फोन करून त्याच्या आत्महत्येची
बातमी द्यावी. तसाही कोण होता तो माझा. तरीही माझ मन एवढ अस्वथ का व्हाव?
आणि मनात आठवू लागलो कोण होता सरपंच.. का.. का आत्महत्या केली असेल
त्याने. मनात मी त्याचे संदर्भ आठवू लागलो.
सरपंच.. २ वर्षापूर्वी
अशीच भटकंती करत असताना एका गावात तो भेटला. तो मला पहिल्यांदा भेटला म्हणजे दिसला
तोही रात्री १० वाजता. त्याच नाव ... ? सरपंचच... नाव सांगता येणार
नाही. नाही, कधी विचारलंच नव्हत नाव मी त्याला. त्यामुळे ते
आजही आठवणार नाही. हे नक्की. तसही त्याच्या नावाची कधी गरज पडली नाही. सरपंच,
हीच ओळख त्याची गावाला होती आणि मलाही तीच ओळख झाली. तस त्याच वयही
जास्त नव्हत. आज या घडीला त्याचं वय असेल ३५-४० फक्त. पण त्याने स्वतला संपवून
घेतलं. इतका खचला होता तो कि जगण्याला इतका कंटाळला होता.
दोन वर्षापूर्वी
पहिल्यांदा सरपंच पहिल्यांदा तो दिसला. असच रात्री १० वाजता गावात उतरलो. रेस्ट
हाउस चालत जाताना समोरून त्याला येताना पाहून सोबतचा माणूस त्याला पाहून म्हणाला,
“काय सरपंच घरी का ?” ते ऐकून तो उत्तरला “नाही, घरी चाललोय” यावरून माझी
त्याच्या दारू पिल्याची जाणीव पक्की झाली. थोडे पुढे गेल्यावर त्या व्यक्तीला मी
विचारले हा तुमचा सरपंच असा कसा, त्यावर तो सोबतचा माणूस
लगेच बोलला. त्याची खूप मोठी गोष्ट आहे.
चांगली १०-१२ एकर शेती होती. सगळ घालवलं आता बसतो आता असा पिऊन... त्याच्या या
बोलण्याने मनात उत्सुकता जागी झाली. म्हणून मी मनात थोडा अंदाज बांधत विचारल,
निवडणुकीत...? त्यावर त्याने फक्त थोडस मनात
हसत “हो’’ अस एवंढच उत्तर दिल. नंतर तोही
काही बोलला नाही आणि मीही.
दुसऱ्या दिवशी सकाळी गावात फिरताना
सरपंच दिसला. मनात पुन्हा उत्सुकता जागी झाली. म्हणून त्याला भेटलो. मनात विचारावं
कि नाही असा विचार करतच शेवटी मनाचा हिय्या करून विचारल,
“सरपंच, अस का ? मला
समजून घ्यायचं.” तो क्षणभर शांत राहिला. मला काहीतरी
चुकल्यासारख वाटलं. मी त्याला सॉरी बोललो. “नाही, नाही तसं काही नाही” तो बोलला
तसही यात न सांगण्यासारखं काही नाही.
मी यावर काहीच बोलू शकलो नाही. आणि तो बोलू लागला. “शिकायला
पुण्यात होतो” त्याच हे पहिलच वाक्य माझ्यासाठी धक्का होता.
मी काही बोलणार तोच तो पुन्हा बोलू लागला. मी शांतच राहिलो. तसा अभ्यासात हुशारही
होतो. पण नियतीचा खेळ तसा खूप अवघड असतो ना. अचानक दिवस फिरले. वडिलांचे निधन
झाले. आणि घराची जबाबदारी म्हणून गावाकडे परत आलो. आणि हीच खरी आयुष्यातली सगळ्यात
मोठी चूक होती अस म्हणता येईल. शेती बरी होती. चांगल उत्पन्नही मिळत होत. तसं सगळं
बरं चाललं होत अस म्हणता येईल. पण नियतीने समोर खूप मोठा खेळ समोर मांडला होता.
तसं मला राजकारणात कधी इंटरेस्ट
नव्हता. पण गावात ग्रामपंचायतची निवडणूक आली. गावात, गावच्या
संस्कुतीला मी नवीन होतो. कदाचित मलाच ती संस्कुती नवी होती. यात मी वाहत गेलो.
गावातल्या लोकांनी उच्चशिक्षित आणि सुसंस्कृतपणाच्या नावाखाली लोकांनी निवडणुकीला
उठवून बसवलं. घरातून विरोध होता. त्याचं बरोबरच होत. पण मला समोर काहीच दिसत
नव्हत. पहिल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे जिंकलोही. आणि महत्वाकांक्षा पूर्ण झाली.
सरपंच झालो. गावचा सरपंच. आज अजूनही आठवत जग जिंकल्याचा अविर्भाव त्या क्षणी जाणवत
होता. पण राजकारणाचा काहीच अनुभव नसलेला मी. खरं मला त्याचा काही अनुभव नव्हता.
पैसा कुठून येतो आणि कसा जातो हे कधीच समजलं नाही. पण सत्ता अंगात शिरते अस
म्हणतात तसंच सत्ता अंगात घुसली. गावात फिरताना, इकडे तिकडे
फिरताना चार लोक सोबत घेवून फिरू लागलो. आणि खिशातला पैसा खर्च होवू लागला. नंतर
नंतर पुढे पैसा खर्च कमी पडू लागला. म्हणून जमीन विकली, त्याच
पैश्यातून गाडी खरेदी केली. खरतर मी यात गुंतत चाललो होतो. पण मला जाग येत नव्हती.
सत्तेतली वर्ष कशी संपून गेली याची जाणीवही झाली नाही. पुढची निवडणुकीत आली.
कदाचित त्यावेळी तरी मी थांबायला पाहिजे होते. पण मी थांबलो नाही.
पुढची निवडणुकीत मी स्वतःहून
प्रतिष्ठेची बनवली. जिंकण्याची लालसा लागली होती. मग ठरवलं,
कि पैसा खर्च करायचा. आणि पुन्हा जमीन विकायला काढली. पैसा खर्च
झाला. तरीही निवडणुकीत हरलो. हे सगळं गावच्या राजकारणाचाच भाग होता याची जाणीव आज
होती आहे. निवडणुकीत झाली, सगळं संपल होत. जमीन गेली होती.
हातात काहीच उरलं नव्हत नावापुढे फक्त सरपंच हा एवढा एकच शब्द उरला होता. त्याची
किती मोठी किंमत मी मोजली होती. सरपंच किती हताशपणे सांगत होता. नंतर किती तरी वेळ
तोही आणि मीही फक्त शांत होतो. काही वेळानंतर तो तसाच निघून गेला काहीही न बोलता.
त्याच्या त्या पाठमोऱ्या आकृतीकडे मी किती वेळ सुन्न होवून पाहत होतो.
आज किती दिवसानंतर शिवाचा
फोन आला. सरपंच, आत्महत्या केली त्याने. तो पुन्हा जागा
झाला माझ्या मनात. मागच्या वेळेस भेटला होता पुन्हा. किती खंगला होता. स्वताच्या
आतमध्ये गुंतून गेला होता. डोक्यावर खूप कर्ज होत चालल आहे. सांगत होता जुन्या
सवयी सुटत नाहीत. दारू पाठलाग सोडत नाही. त्याच दिवशी वाटलं होत, हा असाच राहिला तर एक दिवस कर्जाचा डोंगर याचा बळी घेईन. आज तो जिवंत नव्हता. तसही त्याला मी फक्त
भेटलोही असेल फक्त सात आठ वेळा पण त्याची व्यथा समजली होती. म्हणून कुठेतरी
त्याच्या बद्दल मनात आपलेपण निर्माण झाले होते. म्हणून म्हटलं निदान शेवटच दर्शन
घ्याव. म्हणून उठलो. तयार होवून निघालो. बसमध्ये बसलो बसमध्ये काहीतरी सोबत हवं,
म्हणून पेपर घेतला. शांतपणे पेपर वाचत होतो. पेपरात बातमी होती.
मागच्या १० वर्षात राज्यात १०००० जास्त शेतकर्यांच्या कर्जामुळे आत्महत्या. मन
सुन्न झाल. मनात विचार या एवढ्या मोठ्या आकड्यात असे कितीतरी सरपंच असतील ज्यांची
व्यथा फक्त कर्जच नव्हती. ती फक्त एक आत्महत्या नव्हती.
-प्रविण रघुनाथ काळे
मो - ८३०८७९३००७
0 Comments