बाईक्सवरच्या त्या रंगबेरंगी पट्ट्या कशासाठी ?
रंगबेरंगी दिसणाऱ्या या फ्लॅग्जच्या प्रत्येक रंगामागे एक अर्थ दडलाय, हे समजून घ्यावेच लागेल.
रस्त्यांवरुन धावणाऱ्या बाईक्स, कारवर रंगबेरंगी पट्टया आपण पाहीलेल्या असतात. यासंबंधी उत्सुकता असते. पण आपल्याला जास्त काही माहीती नसल्याने ‘काय रे लदाकला गेला होता का ?’ एवढच आपण विचारतो. लदाकला गेल्यावर या पट्टया मिळतात ज्यावर तिबेटी भाषेमध्ये काहीतरी लिहीलेल असत, एवढीच आपल्याला याबद्दल माहीती असते. पण आता इथुन पुढे तुम्हालाही या रंगबेरंगी पट्ट्यांमागची रंजक कहाणी माहीती असणार आहे. मग हे वाचाच…
Prayer flag
सर्रासपणे रंगबेरंगीत कापडी पट्ट्या वेगात फडफडताना आपण पाहत असतो. यावर चीनी किंवा जपानी भाषेत लिहिलेली अक्षरे दिसून येतात. पण या तिबेटीयन भाषेतील ‘प्रेयर फ्लॅग्ज’ आहेत किंवा आपण त्यांना ‘तिबेटी पवित्र प्रार्थना ध्वज’ म्हणू शकतो. या पट्ट्या दोन प्रकारच्या असतात. आडव्या फ्लॅग्जला “लुंग ता” असे म्हटले जाते. ज्याचा अर्थ होतो “वायुरूपी घोडा”. म्हणूनच कदाचित आपल्या बाईकला “लुंग ता” म्हटलेले प्रत्येक बाईकस्वाराला आवडत असल्याने कदाचित प्रत्येक बाईकवर लुंग ता च्या प्रेयर फ्लॅग्ज दिसतात. दुसऱ्या प्रकारातील पट्ट्या उभा असतात ज्यांना “डार चोग” म्हटले जाते ज्याचा अर्थ होतो “पवित्र ध्वज” तसेच जमिनीपासून नेहमी उंच जागी लावलेले असतात. जेणेकरून या फ्लॅग्जवर लिहिलेल्या मंत्रांची सकारात्मक उर्जा हवे मार्फत सर्वदूर जावी असा यामागचा हेतू असतो. वरकरणी रंगबेरंगी दिसणाऱ्या या फ्लॅग्जच्या प्रत्येक रंगामागे एक अर्थ दडला आहे. यातील प्रत्येक रंग हा पाच तत्वांचे प्रतिनिधित्व करतो. पांढरा रंग वाऱ्याचे, लाल रंग आगीचे, हिरवा रंग पाण्याचे, पिवळा रंग पृथ्वीचे आणि निळा रंग आकाशाचे प्रतिक आहे. हे फ्लॅग्ज स्थिर असू नयेत तसेच जमिनीवर ठेवू नये असेही मानले जाते.
फ्लॅग्जवर काय लिहीलय ?
फ्लॅग्जवर नक्की लिहीलय काय याची उत्सुकता आपल्या प्रत्येकाला असतेच. तर फ्लॅगवर लिहिलेली अक्षरे मुळात तिबेटी भाषेतील एक बौद्ध मंत्र आहे. ज्याचे बोल आहेत ॐ मणिपद्मे हूं !. या मंत्राला स्पष्ट असा अर्थ जरी नसला तरी असे म्हणतात कि या मंत्राचा जाप केल्याने चित्त थाऱ्यावर येऊन राग, लोभ, मत्सर, द्वेष यांवर माणूस विजय मिळवू शकतो. या फ्लॅग्जचा ‘गुड लक’ म्हणून वापर केला जातो.
तर आता नक्कीच त्या Prayer flag चा अर्थ समजला असेल.
- प्रविण रघुनाथ काळे.
- प्रविण रघुनाथ काळे.
दै. प्रभात, पुणे १६ एप्रिल २०१७ |
0 Comments